SC Rejects EVM-VVPAT Verification Plea : ईव्हीएमद्वारेच होणार मतदान; सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट पत्रिकांच्या १०० टक्के पडताळणीची फेटाळली याचिका

व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम वापरून केलेल्या मत पत्रिकांचे क्रॉस-व्हेरिफिकेशन मागणारी विरोधकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Supreme Court | (Photo Credits: IANS)

SC rejects EVM-VVPAT verification plea : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने लोकसभा निवडणूकादरम्यान महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय(Supreme Court)ने व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम (EVM) वापरून केलेल्या मतांची पडताळणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. व्हीव्हीपॅट (VVPAT )सह इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) वापरून टाकलेल्या मतांचे संपूर्ण क्रॉस-व्हेरिफिकेशन करण्याची मागणी करणाऱ्या याचिका विरोधी पक्षाने केल्या होत्या. त्याशिवाय, बॅलेट पेपर प्रणाली वापरून मतदान करण्याच्या प्रक्रियेला ही नकार दिला आहे. (हेही वाचा :EVMs and VVPAT Cross-Verification: ईव्हीएमच्या कार्यपद्धीवर अनेक शंका; सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now