पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन केली चर्चा, संरक्षण करारबाबत केला पाठपुरावा

६ डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. ते 21व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. यादरम्यान भारत आणि रशियामध्ये अनेक संरक्षण करार झाले.

(Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर चर्चा केली. या संभाषणात दोन्ही नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीदरम्यान चर्चा झालेल्या काही मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. ६ डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. ते 21व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. यादरम्यान भारत आणि रशियामध्ये अनेक संरक्षण करार झाले.