Modi In Pakistan: पाकिस्तानामधील जनतेलाही वाटत आहे की, आपल्या देशातही मोदीजींसारखा पंतप्रधान हवा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

आजकाल पाकिस्तानातही मोदीजींसारखा पंतप्रधान हवा, अशी चर्चा सुरू असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Modi In Pakistan: पाकिस्तानामधील जनतेलाही वाटत आहे की, आपल्या देशातही मोदीजींसारखा पंतप्रधान हवा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
Rajnath Singh (Photo Credits: ANI)

Modi In Pakistan: पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही देश कोणत्या प्रकारच्या संकटाचा सामना करत आहेत, हे सांगण्याची गरज नाही. आजकाल पाकिस्तानातही मोदीजींसारखा पंतप्रधान हवा, अशी चर्चा सुरू असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, एक काळ असा होता की क्रोनी कॅपिटलिझमला एवढी चालना मिळाली होती की लोकांना फक्त फोन करून करोडो रुपयांची कर्जे दिली जात होती. नंतर त्या कर्जाची वसुली करणे कठीण झाले, नरेंद्र मोदींनी तो प्रकार 'फोन बँकिंग' बंद केला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग प्रणाली मजबूत करण्यासाठी केलेल्या सुधारणांमुळे आज लोकांचा बँकिंग प्रणालीवरील विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2023 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).