Haryana Accident: महेंद्रगड येथे भीषण अपघात, स्कूल बस पलटल्याने पाच मुलांचा जागीच मृत्यू

हरियाणा येथील महेंद्रगडी परिसरातील कनिना येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

haryana Accident {PC TWITTER

Haryana Accident:  हरियाणा येथील महेंद्रगडी परिसरातील कनिना येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उनहनी गावातून शाळेची बस जात असताना बस उलटली. या अपघातात पाच मुलांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना देताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या घटनेची तपासणी करत आहे. अपघातात अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. हा अपघात ओव्हरटेकींमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना बस चालकाला ताब्यात घेतले आहे. बस चालक दारूच्या नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- रस्ता ओलांडताना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षकाचा अपघात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)