Tamil Nadu Road Accident: तामिळनाडूत भीषण अपघात, लॉरी आणि कारच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट लॉरी आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Tamil Nadu Road Accident: तामिळनाडूत भीषण अपघात, लॉरी आणि कारच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू
Accident PC Twitter

Tamilnadu Accident: तामिळनाडू येथील तेनकासी जिल्ह्यातील पुलियांगुडीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट लॉरी आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दोन्ही वाहनांच्या धडकेत अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2024 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).