Heavy Rains in Tamil Nadu: मुसळधार पावसानंतर तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील सखल भागातील घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये शिरले पाणी
भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवसांत तामिळनाडूतील 10 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तामिळनाडूतील मुसळधार पावसामुळे इरोड जिल्ह्यातील सखल भागात असलेल्या घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरले. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवसांत तामिळनाडूतील 10 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान बदलामुळे तामिळनाडूच्या 10 हून अधिक जिल्ह्यांमध्ये वेळो-अवेळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने एका निवेदनात म्हटले आहे. कन्याकुमारीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)