Sukhdev Singh Gogamedi Murder: सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी 2 मुख्य आरोपींसह तिघांना घेतले ताब्यात; चंदीगड येथून अटक

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत दोन मुख्य आरोपींसह तिघांना चंदीगड येथून ताब्यात घेतले,

Sukhdev Singh Gogamedi Murder

Delhi Crime Branch: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत दोन मुख्य आरोपींसह तिघांना चंदीगड येथून ताब्यात घेतले, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी रविवारी दिली आहे. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपी रोहित राठोड आणि नितीन फौजी यांचाही समावेश आहे. तिन्ही आरोपींना दिल्लीत आणले जात असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमाना दिली आहे. नंतर त्यांना दिल्लीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. याआधी शनिवारी, 9 डिसेंबर रोजी जयपूर पोलिसांनी गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी हरियाणातील महेंद्रगड येथील रहिवासी रामवीर सिंग याला अटक केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif