Delhi: बायोमेट्रिकचा वापर करताना विद्यार्थिंनीला लागला विजेचा धक्का, रुग्णालयात उपचार सुरु
ही घटना जेव्हा ती नोंदणी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करत होती. त्यावेळीस तिला विजेचा धक्का लागला. अवस्थी असं तरुणीचे नाव आहे. विजेचा धक्का लागल्याने तीला गंभीर दुखापत झाली.
Delhi: दिल्लीत एका विद्यार्थींनीला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. ही घटना जेव्हा ती नोंदणी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करत होती. त्यावेळीस तिला विजेचा धक्का लागला. वाणी अवस्थी असं तरुणीचे नाव आहे. विजेचा धक्का लागल्याने तीला गंभीर दुखापत झाली. तीला तात्काळ दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तीला युपी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. बायमेट्रिकच्या ठिकाणी पाणी साचले होते. हजेरी लावत असताना तिला विजेचा धक्का बसला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत खळबळजनक घटना घडत आहे. दिल्लीच्या जून्या राजिंदर नगर भागात पाणी साचल्यामुळे UPSCच्या तीन उमेदवारांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा- मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, घराचे छत कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू, पाच जण जखमी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)