Shocking Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती भटक्या कुत्र्याला प्रेमाने हात लावत आहे. त्याला गोंजराताना दिसत आहे. पण काही वेळाने याच कुत्र्याने सदर व्यक्तीवर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सकाळच्या वेळीस एक व्यक्ती रस्त्यावर उभा असतो. त्यावेळीस अचानक एक भटक्या कुत्र्याला त्याच्या जवळ येतो. तो व्यक्ती प्रेमाने कुत्र्याला हात लावतो. त्याला गोंजारतो. काही मिनिटांने लगेच कुत्र्याच्या वर्तनात बदल होतो आणि अचानक त्याच्यावर हल्ला करतो.कुत्र्याने हाताला चावा घेतल्याचे समोर आले आहे. यात तो व्यक्ती जखमी झाला. (हेही वाचा- पाळीव लॅब्रो डॉगच्या हल्ल्यात कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू, नेटकरी मालकावर संतापले (Watch Video)
कुत्र्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ
Tf just Happened?💀
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)