Delhi Dog Attack Video: पाळीव लॅब्रो डॉगच्या हल्ल्यात कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू, नेटकरी मालकावर संतापले (Watch Video)

दिल्लीच्या गोरखपार्क वेलकम परिसरात एका पाळीव कुत्र्याने भटक्या कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केले. या घटनेत पिल्लाचा मृत्यू झाला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Delhi Dog Attack Video: पाळीव लॅब्रो डॉगच्या हल्ल्यात कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू, नेटकरी मालकावर संतापले (Watch Video)
dog Attack Delhi Video PC X

Delhi Dog Attack Video: दिल्लीच्या (Delhi) गोरखपार्क वेलकम परिसरात एका पाळीव कुत्र्याने भटक्या कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केले. या घटनेत पिल्लाचा मृत्यू झाला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी पाळीव कुत्र्याच्या मालकावर संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- अमरोहामध्ये भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; स्थानिकांनी वाचवला मुलीचा जीव, घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक रस्त्यावरून जात असताना एका कुत्र्याच्या पिल्लाने त्यांच्यावर भुंकले. पाळीव कुत्रा हा लॅब्राडॉग जातीचा आहे. त्यानंतर मालकाने त्याच्या कुत्र्याला भटक्या पिल्लावर हल्ला करण्याचा इशारा दिला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. लॅब्राडॉग पिल्लावर क्रूरपणे हल्ला करतो आणि चावतो. हा हल्ला इतका भयंकर होता की, यात कुत्र्याच्या पिल्लाचा जागीच जीव जातो.

पाळीव कुत्र्याचा हल्ला 

ही घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी पहाटे घडली आहे. व्हायरल व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मालकावर कारवाई करण्याची विनंती केली. कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला होत असताना, मालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. या घटनेला पाळीव कुत्र्याचा मालक जबाबदार असल्याचे आरोप नेटकऱ्यांनी केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2024 09:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).