SpiceJet's Delhi-Srinagar Flight: दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला कॉकपिटच्या खोट्या चेतावणीमुळे करावे लागले IGI विमानतळावर लँडिंग

मागील मालवाहू होल्ड उघडल्यानंतर, आग किंवा धुराचे कोणतेही चिन्ह आढळले नाही आणि प्राथमिक मूल्यांकनाच्या आधारे, इशारा खोटा असल्याचे दिसून आले.

SpiceJet Flight (Photo Credits: PTI)

SpiceJet's Delhi-Srinagar Flight: दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला कॉकपिटच्या खोट्या अलर्टमुळे मंगळवारी IGI विमानतळावर परत उतरावे लागले. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पाईसजेट फ्लाइट B737 फ्लाइट क्रमांक SG-8373 दिल्ली ते श्रीनगरला कॉकपिटमध्ये एएफटी कार्गो फायर लाईट जळल्यामुळे परत दिल्लीत उतरावे लागले. दरम्यान, स्पाईसजेटने सांगितले की, कॅप्टनच्या चेतावणीनंतर सर्व दिवे विझले आणि सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स सामान्य असल्याचे आढळले. मागील मालवाहू होल्ड उघडल्यानंतर, आग किंवा धुराचे कोणतेही चिन्ह आढळले नाही आणि प्राथमिक मूल्यांकनाच्या आधारे, इशारा खोटा असल्याचे दिसून आले, असेही स्पाईसजेटने निवेदनातात म्हटलं आहे. या विमानात 140 प्रवासी होते आणि सर्वांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. (हेही वाचा - Surat Railway Station Viral Video: सूरत रेल्वे स्टेशनवर RPF जवानामुळे दोन महिलांना जीवदान, पाहा व्हिडिओ)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)