SpiceJet's Delhi-Srinagar Flight: दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला कॉकपिटच्या खोट्या चेतावणीमुळे करावे लागले IGI विमानतळावर लँडिंग
स्पाईसजेटने सांगितले की, कॅप्टनच्या चेतावणीनंतर सर्व दिवे विझले आणि सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स सामान्य असल्याचे आढळले. मागील मालवाहू होल्ड उघडल्यानंतर, आग किंवा धुराचे कोणतेही चिन्ह आढळले नाही आणि प्राथमिक मूल्यांकनाच्या आधारे, इशारा खोटा असल्याचे दिसून आले.
SpiceJet's Delhi-Srinagar Flight: दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला कॉकपिटच्या खोट्या अलर्टमुळे मंगळवारी IGI विमानतळावर परत उतरावे लागले. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पाईसजेट फ्लाइट B737 फ्लाइट क्रमांक SG-8373 दिल्ली ते श्रीनगरला कॉकपिटमध्ये एएफटी कार्गो फायर लाईट जळल्यामुळे परत दिल्लीत उतरावे लागले. दरम्यान, स्पाईसजेटने सांगितले की, कॅप्टनच्या चेतावणीनंतर सर्व दिवे विझले आणि सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स सामान्य असल्याचे आढळले. मागील मालवाहू होल्ड उघडल्यानंतर, आग किंवा धुराचे कोणतेही चिन्ह आढळले नाही आणि प्राथमिक मूल्यांकनाच्या आधारे, इशारा खोटा असल्याचे दिसून आले, असेही स्पाईसजेटने निवेदनातात म्हटलं आहे. या विमानात 140 प्रवासी होते आणि सर्वांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. (हेही वाचा - Surat Railway Station Viral Video: सूरत रेल्वे स्टेशनवर RPF जवानामुळे दोन महिलांना जीवदान, पाहा व्हिडिओ)
SpiceJet's Delhi-Srinagar flight returned to Delhi as the cargo fire warning light illuminated in the cockpit. The light later extinguished upon actions taken by the flight captain and the flight landed safely. No sign of fire or smoke was detected in AFT cargo and the warning…
— ANI (@ANI) April 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 02:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

