Viral Video: रिल्ससाठी काहीपण! बुलेट चालवताना तरुणाचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील लखनऊमधील असल्याचं समजत आहे.

Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक तरुण भरधाव रॉयल एनफिल्ड बाईकवर जीवघेणा स्टंट करत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील लखनऊमधील असल्याचं समजत आहे. व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे तरुण बुलेट चालवताना अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. सोबत त्याने बंदुकीचा धाक दाखवताना दिसला आहे. हा व्हिडिओ रिल्ससाठी काढला असल्याचे निष्पण झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. व्हिडिओतील तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)