बिहारच्या भ्रष्ट अभियंत्याच्या घरात पैशांची खाण; छाप्यात सापडलेली रोकड पाहून उडेल तुमची झोप, Watch Video

शनिवारी त्याच्या पाटण्यातील किशनगंज आणि दानापूर येथील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Bihar Cash counting Video (PC - ANI)

Bihar: बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. किशनगंज आणि पाटणा येथील कार्यकारी अभियंता संजय कुमार राय (Sanjay Kumar Rai) यांच्या ठिकाणांवर पाळत ठेवणाऱ्या पथकाने शनिवारी छापे टाकले. यावेळी घरातून सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूही मोठ्या प्रमाणात सापडण्याची शक्यता आहे. सध्या नोटांची मोजणी सुरू आहे.

मॉनिटरिंग टीमने भ्रष्ट अभियंता संजय राय यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी त्याच्या पाटण्यातील किशनगंज आणि दानापूर येथील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. संजय राय किशनगंज विभागात तैनात आहेत. घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा आल्याचे पाहून निगराणी पथकातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)