HC On Second Marriage: पहिल्या लग्नादरम्यान दुसरे लग्न झाल्यास सरकारी कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळू शकत नाही; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एकल खंडपीठाने पतीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनचा दावा नाकारणाऱ्या पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला आव्हान देणारी महिलेची याचिका फेटाळून लावताना हा निकाल दिला.

Madhya Pradesh High Court (PC- ANI)

HC On Second Marriage: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेवर अतिशय महत्त्वूपूर्ण निर्णय दिला आहे. पहिल्या लग्नादरम्यान दुसरे लग्न झाल्यास सरकारी कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळू शकत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एकल खंडपीठाने पतीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनचा दावा नाकारणाऱ्या पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला आव्हान देणारी महिलेची याचिका फेटाळून लावताना हा निकाल दिला. या प्रकरणात, याचिकाकर्त्याने पोलीस अधीक्षक मंडला यांच्याकडून उत्तम सिंग मारावी (अर्जदाराचे पती) यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्याचा तिचा दावा नाकारल्याबद्दल आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याचे अधिवक्ता अरुण कुमार सिंग यांनी असा युक्तिवाद केला की, उत्तम सिंग यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता आणि तिने नोटरी शपथपत्र दिले होते. (हेही वाचा -SC On Christian-Muslim Dalit Converts: सर्वोच्च न्यायालयात ख्रिश्चन आणि मुस्लिम दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याबाबत याचिका दाखल; जाणून घ्या काय म्हणाले सुप्रीम कोर्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)