Delhi Pollution: दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळा एका आठवड्यासाठी बंद, सरकारी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश
तसेच 14 ते 17 नोव्हेंबर हे चार दिवस दिल्लीतली बांधकामाची कामेही बंद राहणार आहे.
दिल्लीमधील (Delhi) वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल (Arvinda Kejriwal) सरकारनं कठोर निर्णय घेत सोमवारपासून शाळा एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. तसंच सरकारी कार्यालयं देखील बंद राहणार असून सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी कार्यालयांसाठीही आवाहन करणारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच 14 ते 17 नोव्हेंबर हे चार दिवस दिल्लीतली बांधकामाची कामेही बंद राहणार आहे.