Black Movie On OTT: संजय लीला भन्साळींचा ब्लॅक चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती.त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, संगीत, छायांकन हे सारं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते.

अमिताभ बच्चन (Amithabh Bacchan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांचा मास्टरपीस म्हणून ओळखला जाणारा संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शीत ब्लॅक (Black) हा चित्रपट तब्बल 19 वर्षानंतर ओटीटीवर रिलीझ झाला आहे.  अमिताभ  बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यावेळी त्यांनी नेटफ्लिक्सवरील ब्लॅक चित्रपटाचा ट्रेलरही पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, या चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आम्ही नेटफ्लिक्सवरुन त्याच्या प्रदर्शनाचा आनंद साजरा करत आहोत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement