Sakshi Murder Case: दिल्लीतील शाहबाद डेअरीमध्ये साक्षीची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक

नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात रविवारी साहिलने साक्षीवर अनेक वेळा चाकूने वार केले आणि तिचे डोके दगडाने ठेचले.

Sakshi Murder Case accused Sahil (PC- Twitter/ANI)

Sakshi Murder Case: दिल्ली पोलिसांनी सोमवारी दुपारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून 20 वर्षीय साहिलला ताब्यात घेतले. शाहबाद डेअरी परिसरात एसी मेकॅनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी साक्षी या त्याच्या 16 वर्षीय मैत्रिणीच्या निर्घृण हत्येसाठी अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात रविवारी साहिलने साक्षीवर अनेक वेळा चाकूने वार केले आणि तिचे डोके दगडाने ठेचले. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शाहबाद डेअरी पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Delhi Girl Murder Video: दिल्ली पुन्हा हादरली! शहरातील शाहाबाद डेअरी परिसरात 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)