Rats Create Havoc In Hospital: निष्काळजीपणा! सरकारी रुग्णालयात उंदराचा कहर, उत्तर प्रदेशातील चिंताजनक व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील सरकारी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी रुग्णालय अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न उपस्थित होणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rats in Hopital

Rats Create Havoc In Hospital: उत्तर प्रदेशातील सरकारी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी रुग्णालय अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न उपस्थित होणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील सरकारी रुग्णालयामध्ये पेशंटच्या रुममध्ये उंदराचा कहर होताना दिसत आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ही घटना चिंताजनत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे उंदीर रुग्णांच्या अंगावर धावताना दिसत आहे.सरकारी रुग्णालयात व्यवस्थापकांचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढमधील जिल्हा सरकारी रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी अधिकाऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. पेशंटच्या जीवाशी खेळला जाणारा हा प्रकार दिसत आहे. अधिकाऱ्यावर कारावाई करा असे कमेंट देखील केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement