Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार तुरुंगातून सुटका; शिक्षा भोगत असलेल्या 6 आरोपींच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Supreme Court (Photo Credit - Twitter)

Rajiv Gandhi Assassination Case: माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला. या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले.

नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने सांगितले की, या खटल्यातील दोषींपैकी एक असलेल्या एजी पेरारिवलनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाबतीतही लागू आहे. खरे तर, 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते. त्याने 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now