Rahul Gandhi Uttarakhand Visit: उत्तराखंड दौऱ्यावर असलेले राहुल गांधी, केदारनाथ मंदिरात संध्याकाळच्या आरतीला लावली हजेरी (View Pics)

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत.

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी दिल्लीहून जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचले. त्यानंतर हेलिकॉप्टरने केदारनाथला आले. राहुल गांधी यांनी केदारनाथ येथे पोहोचून बाबा केदारनाथ यांची विशेष पूजा केली. संध्याकाळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा बाबा केदारनाथचे दर्शन घेतले आणि संध्याकाळच्या आरतीत सहभागी झाले. सकाळी जेव्हा राहुल गांधी केदारनाथमध्ये बाबांच्या दारात पोहोचले. राहुल गांधींची एक झलक पाहण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह होता. सर्वांना राहुल गांधींची झलक पाहायची होती.

राहुल गांधी यांची केदारनाथ भेट पूर्णपणे वैयक्तिक आहे. मंगळवारी दुपारी राहुल गांधी केदारनाथहून दिल्लीला रवाना होतील. राहुल गांधी 8 वर्षांनंतर दुसऱ्यांदा केदारनाथला आले आहेत. याआधी 2015 मध्ये राहुल गांधी पायीच केदारनाथला आले होते.

पाहा फोटो -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement