PVR Cinemas Snacks New Prices; चाहत्याने केली महागड्या स्नॅक्सची तक्रार; पीव्हीआर सिनेमाने कमी केल्या खाद्यपदार्थांच्या किंमती, जाणून घ्या दर
या ट्विटमध्ये त्याने तक्रार केली होती की, सिनेमागृहांमधील इतक्या महागड्या पदार्थांमुळे कुटुंबासह चित्रपटांचा आनंद घेणे कठीण आहे.
मंगळवारी झालेल्या बैठकीत जीएसटी कौन्सिलने सिनेमागृहांमधील खाद्यपदार्थांवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये मोठी कपात केली आहे. कौन्सिलच्या बैठकीत सिनेमागृहांमधील खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर पीव्हीआरने बर्गर, समोसा, सँडविच आणि कोल्ड्रिंकच्या दरात कपात केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल झाले होते, ज्यामध्ये वापरकर्त्याने सांगितले की त्याने पीव्हीआर सिनेमामध्ये खाण्यापिण्यासाठी 820 रुपये खर्च केले. या ट्विटमध्ये त्याने तक्रार केली होती की, सिनेमागृहांमधील इतक्या महागड्या पदार्थांमुळे कुटुंबासह चित्रपटांचा आनंद घेणे कठीण आहे.
याला उत्तर देताना पीव्हीआरने ट्विट केले की, वीकडेजच्या ऑफरमध्ये सोमवार ते गुरुवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत बर्गर आणि समोसा 99 रुपयांना मिळेल. याशिवाय सँडविच + पेप्सी 99 रुपयांना मिळेल. तर, वीकेंड ऑफर अंतर्गत, पॉपकॉर्न आणि पेप्सी अनलिमिटेड शुक्रवार ते रविवार रिफिल केले जातील. पीव्हीआरने सांगितले की, आमच्यासाठी प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे. (हेही वाचा; GST Council Meet: सिनेमागृहातील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, तर ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रायडींग आणि कॅसिनो महागणार; जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)