PM Modi on Rishabh Pant Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंतसाठी ट्विटवर पोस्ट शेअर करत केली प्रार्थना

या अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Modi, Rishabh Pant (PC _ Facebook Instagram)

PM Modi on Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर रस्ता अपघात झाला. या अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. देशातील सर्व सेलिब्रिटींनी ऋषभ पंतबद्दल ट्विट केले आहे आणि त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदींनी ऋषभ पंतसाठी ट्विट करत लिहिले की, "प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताने दु:ख झाले आहे. मी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो." (हेही वाचा - Rishabh Pant Car Accident: भीषण अपघातानंतर ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिका आणि आयपीएलमधून होवू शकतो बाहेर)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement