PM Modi Takes Flight In Tejas Fighter: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलं तेजस फायटरमधून उड्डाण

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या उत्पादन केंद्रात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मोदी आले होते. पंतप्रधान मोदी संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर जोर देत आहेत.

PM Modi Takes Flight In Tejas Fighter (PC - Twitter)

PM Modi Takes Flight In Tejas Fighter: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सरकारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या भेटीदरम्यान बेंगळुरू येथे तेजस फायटरमधून उड्डाण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या उत्पादन केंद्रात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मोदी आले होते. पंतप्रधान मोदी संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर जोर देत आहेत. सरकारने भारतातील उत्पादन आणि त्यांची निर्यात कशी वाढवली आहे यावर लक्ष देत आहे. तेजस हे हलके लढाऊ विमान खरेदी करण्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे. यूएस डिफेन्स कंपनी GE एरोस्पेसने पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान एमके-II-तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी HAL सोबत करार केला होता. (हेही वाचा - Uttarkashi Tunnel Rescue Update: उत्तरकाशी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा अडथळा, Vertical Drilling वर निर्णय होण्याची शक्यता)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement