Karnataka News: माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी वीज चोरल्याप्रकरणी FIR दाखल; JDS कार्यालयाबाहेरचे पोस्टर हटवले

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी यांच्यावर कॉंग्रेसने वीज चोरीचा आरोप केला.

HD Kumaraswamy

Karnataka News: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी यांच्यावर  कॉंग्रेसने वीज चोरीचा आरोप केला. याप्रकरणी जयनगर दक्षता पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एचडी कुमारस्वामी यांच्याविरुध्द वीजचोरीसाठी एफआयआर केल्यानंतर बेंगळुरु येथील JDS मुख्य कार्यालयाबाहेर वीज चोरीचे पोस्टर्स लावण्यात आले होते. बेंगळुरु पोलिसांनी मुख्य कार्यालयाबाहेरचे 'वीज चोर' पोस्टर्स काढून टाकले. बेंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (BESCOM) अधिकाऱ्यांनी BESCOM दक्षता जयनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे FIR नोंदवण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now