Union Minister Arjun Munda on Sharad Pawar: लोकसभा निवडणूक 2024 च्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
शरद पवारांच्या लोकसभा निवडणुक 2024 बाबतच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचे (NCP) सर्वोसर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2024 च्या निवडणूका Common Minimum Program द्वारा विरोधकांनी एकत्र येवून भाजप विरुध्द निवडणुका लढण्याचा इशारा दिला होता. तरी शरद पवारांच्या या वक्तव्यास केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा (Union Minister Arjun Munda) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. अर्जुन मुंडा म्हणाले पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सामान्य नागरिक, राज्य आणि संपूर्ण देश सुरक्षित आहे. विरोधक उत्तम प्रकारे सत्ताधारी पक्षाला विरोध दर्शवत आहे पण जनतेला विरोध नाही विकास हवा आहे, अशी खोचक प्रतिक्रीया देत अर्जुन मुंडांनी सर्वपक्षीय विरोधकांवर निशाणा साधला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)