Ayodhya Poul: ठाण्यातील खासगी कार्यक्रमात अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक; (Watch Video)

कळव्यात अयोध्या पौळ यांच्यावर काही महिलांनी शाई फेकली. याच संदर्भात अयाेध्या यांनी विरोधकांवर टीका करत ट्विटरवरून ट्विट केले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करत पोलीस या महिलांचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली.

Ayodhya Poul:  ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ठाण्यात त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.आणि काही महिलांनी त्यांच्यासोबत गैरवर्तणुक केल्याचे आरोप कळवा पोलीस ठाण्यात केले आहे. शुक्रवारी कळव्यातील मनिषा नगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ह्या खासगी कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. त्यावेळी काही महिलांनी अयोध्या यांना घेरल आणि त्यावर शाई फेकण्यात आली. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारच्या रात्री उशिरा पर्यंत हा प्रकार चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

अयोध्या पौळ पाटील यांचं ट्विट काय?

ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आणि समाजमाध्यम राज्य समन्वक अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात याप्रकाराची तक्रार केली आहे. अयोध्या यांनी विरोधकांवर टीका करत ट्विट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement