Ajit Pawar यांची नाराजी ते घराणेशाही वर Supriya Sule यांनी स्पष्टचं मांडल मत; पहा काय म्हणाल्या?

शरद पवार यांची लेक असल्याने सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत पक्षात नवं पद बनवून मोठी जबाबदारी देण्यात आली अशी टीका अनेकांकॅडून केली जात आहे.

Supriya Sule | Twitter

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये कार्यकारी अध्यक्ष हे नवं पद बनवून त्याची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिली आहे. यावरून अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे. अनेकजण यावरही "घराणेशाही" चा शिक्का मारला आहे. सुप्रिया सुळे यांनी मात्र घराणेशाही च्या टीकांना झिडकारलं आहे. 'तुम्ही सोयीने घराणेशाही शब्द वापरू शकत नाही. पवारांच्या घरात माझा जन्म झाला याला मी काही करू शकत नाही. संसदेमधील माझी कामगिरी बघा. संसद तर माझे वडील चालवत नाहीत. त्यामुळे कार्याध्यक्ष पद सांभाळताना पक्षाला मोठं करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं' सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दरम्यान यामध्ये अजित पवार नारजा नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. प्रसारमाध्यमातील बातम्या अफवा असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. NCP New Working Presidents: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांची मोठी घोषणा; कार्यकारी अध्यक्ष हे नवं पद तयार करत या 9 जणांमध्ये जबाबदारीचं विभाजन .

घराणेशाहीवर प्रतिक्रिया

अजित पवार नाराज नाहीत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now