Nitish Kumar Resigns as Bihar CM: नीतीश कुमार यांचा बिहार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; बिहार मध्ये 'सत्तांतराच्या' खेळाला सुरूवात
नीतीश कुमार यांच्या या खेळीने इंडिया आघाडीला मोठा झटका बसणार आहे.
बिहार मध्ये नीतीश कुमार यांनी पुन्हा सत्ताबदल केला आहे. आज त्यांनी राज्यपालांची भेट घेत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या भाजपा चे बडे नेते देखील बिहार मध्ये दाखल झाले आहेत. नीतीश कुमार यांच्या या खेळीने इंडिया आघाडीला मोठा झटका बसणार आहे. दरम्यान नीतीश कुमार यांच्याकडेच सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (हेही वाचा - Nitish Kumar To Take Oath As CM: भाजपच्या पाठिंब्याने नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार; रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ - रिपोर्ट)
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)