तिसर्यांदा भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान होणार्या PM Modi यांना जगभरातून शुभेच्छा; तणावग्रस्त संबंध असतानाही Canadian PM Trudeau यांच्याकडून अभिनंदन!
कॅनडा आणि भारता मध्ये तणावग्रस्त संबंध असतानाही PM Trudeau यांच्याकडून अभिनंदनाचा संदेश आला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर काल एनडीए च्या झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची निवड एनडीए चे नेते म्हणून करण्यात आली. येत्या 8 जूनला ते पंतप्रधान म्हणून तिसर्यांदा शपथबद्ध होण्याच्या तयारी मध्ये आहेत. अशात त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. भारतीय वंशाचे आणि यूके चे पंतप्रधान ऋषि सुनक, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक राष्ट्राध्याक्षांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर बांग्लादेश आणि नेपाळचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी देखील लावणार आहेत. कॅनडा आणि भारता मध्ये तणावग्रस्त संबंध असतानाही PM Trudeau यांच्याकडून अभिनंदनाचा संदेश आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)