ED Summons Dinesh Bobhate : अनिल देसाई यांचे निकटवर्ती दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स, आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

अनिल देसाई यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. कारण, आता मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांचे निकटवर्तीय दिनेश बोभाटे यांना समन्स बजावण्यात आले आहे.

Photo Credit - twitter

ED Summons Dinesh Bobhate : दिनेश बोभाटे यांना समन्स बजावत ईडीने (ED) त्यांना चौकशीसाठी या आठवड्यात ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) गटाला एक मोठा घटका दिला जात असल्याचे मानले जात आहे. १७ डिसेंबर २०२३ रोजी सीबीआयने बोभाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या (CBI)तपासात बोभाटे याच्यांकडून सीबीआयला दोन कोटी ५८ लाखांची बेहिशेबी मालमत्ता मिळाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.(हेही वाचा : Anil Desai Summoned: ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now