Champai Soren यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; Hemant Soren पुन्हा सीएम होण्याची शक्यता!
चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला, जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना सर्वोच्च पदावर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री Champai Soren यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री पदी पुन्हा Hemant Soren विराजमान होण्याची शक्यता आहे. ईडी च्या अटकेनंतर त्यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. झारखंड हाय कोर्ट ने 28 जून दिवशी त्यांना जामीन दिला आहे. त्यांनी अटकेपूर्वी 31 जानेवारीला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)