UP Police Video: उष्णतेने त्रस्तलेल्या जनावरांसाठी पोलिस अधिकारी आले धावून, उत्तर प्रदेशातील व्हिडिओ व्हायरल
तीव्र उष्णतेने त्रस्तलेल्या जनावरांसाठी उत्तर प्रदेशातील एक पोलिस अधिकारी धावून आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात युपी पोलिस अधिकारी माकडांना, गायींना खाण्यासाठी केळी आणि चणे वाटप करत आहे.
UP Police Video: तीव्र उष्णतेने त्रस्तलेल्या जनावरांसाठी उत्तर प्रदेशातील एक पोलिस अधिकारी धावून आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात युपी पोलिस अधिकारी माकडांना, गायींना खाण्यासाठी केळी आणि चणे वाटप करत आहे. या व्हिडिओनी हजारों लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पोलिस अधिकारी आपल्या सहकारी सोबत माकडांच्या पिल्लांना केळे वाटप करत आहे. त्याचबरोबर गायींना खाण्यासाठी चणे दिले आहे. तीव्र उष्णतेत जनांवरांना दिलासा देण्यासाठी पोलिसाने महत्त्वाची कामगिरी केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसाचा हा खास अंदाज पाहून प्राणी प्रेमी खुश झाले आहे. (हेही वाचा- अहमदनगरचे MP Nilesh Lanke यांच्या जलद कारवाईमुळे एका निष्पाप बालकाचा जीव वाचला, पाहा व्हिडीओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)