PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार; राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे’ पंतप्रधान साक्षीदार होणार आहेत.

PM Narendra Modi (PC - ANI)

PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 4:15 च्या सुमारास पंतप्रधान सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथे पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) अनावरण करतील. त्यानंतर पंतप्रधान सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे ‘नौदल दिन 2023’ (Navy Day 2023) समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे’ पंतप्रधान साक्षीदार होणार आहेत. (हेही वाचा - PM Modi On Selfie With Giorgia Meloni: 'मित्रांना भेटणे हा नेहमीच आनंददायी अनुभव'; जॉर्जिया मेलोनीसोबतच्या सेल्फीवर पंतप्रधान मोदींची पोस्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)