Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत पीएम मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, लोकांना मतदान करण्याचे केले आवाहन
सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात आज राज्यातील 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. पीएम मोदींनीही साबरमती विधानसभेच्या जागेवर मतदान केले. सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात आज राज्यातील 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व लोकांना, विशेषत: तरुण मतदार आणि महिला मतदारांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडावे, असे आवाहन करतो. हेही वाचा Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आज अंतीम टप्प्याचं मतदान, जनतेचा कौल कुणाला?