Rahul Gandhi-PM Modi Handshake Video: राहुल गांधी येताच पीएम मोदींनी हसतमुखानं केलं हस्तांदोलन; संसदेमधला 'हा' व्हिडीओ चर्चेत! (Watch Video)

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली. या सर्व घडामोडींदरम्यान लोकसभेत दुर्मिळ असा प्रसंग पाहायला मिळाला. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून पुढाकार घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हस्तांदोलन केले.

Rahul Gandhi-PM Modi Handshake Video: लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली. ओम बिर्ला यांची निवड जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आपल्या जागेवरून उठून ओम बिर्ला यांच्या जागेवर गेले. तिथे मोदींनी ओम बिर्ला(Om Birla) यांचं अभिनंदन केलं. त्यांच्यात काही बोलणी सुरू असतानाच पाठीमागून राहुल गांधी(Rahul Gandhi) ओम बिर्लांचं अभिनंदन करण्यासाठी आले. त्यांना पाहताच मोदींनी हाताने त्यांना पुढे येण्याची विनंती केली. राहुल गांधींनी पुढे होत ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्यांना अभिनंदन केलं. यानंतर लागलीच त्यांनी मोदींकडे पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राहुल गांधींकडे बघून हसतमुखाने हस्तांदोलन केलं.

 

पोस्ट पहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now