BRICS 2023: PM मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात 'या' विषयी झाली चर्चा (Watch Video)
भारताचे पंतप्रधान आणि चीनच्या राष्ट्रपतींमध्ये एका विषयावर चर्चा झाल्याचे समोर येत आहे. कोणत्या विषयी दोन्ही देशाच्या नेत्यांनी संभाषण केल या विषयी नागरिकांमध्ये हुरहुर लागली होती. या विषयी परराष्ट्र सचिव यांनी सांगितले आहे.
BRICS 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) सद्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत आहे. यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत आहेत. सोबत अन्य देशाचे राष्ट्रपती सामिल आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) हे दोघे एका विषयावर चर्चा करत असताना दिसले. भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात संक्षिप्त चर्चा झाली. दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेत चालताना दोघांनी संभाषण केले.''क्वात्रा यांनी सांगितले की, पीएम मोदींनी भारत-चीन सीमावर्ती भागातील वास्तविक नियंत्रण रेषेवर न सुटलेल्या मुद्द्यांवर कल्पना देण्यात आली. भारत-चीन सीमावर्ती भागातील पश्चिम सेक्टरमधील एलएसीवरील निराकरण न झालेल्या समस्यांबाबत प्रकाश टाकला."