Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे भरपावसात लोकांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत; Watch
वास्तविक, पंतप्रधान मोदी 7-8 जुलै रोजी चार राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. ते या चार राज्यांना 50,000 कोटी रुपयांच्या योजना भेट देतील. पंतप्रधान मोदी शुक्रवारी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत.
Uttar Pradesh: आज उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान मुसळधार पाऊस असूनही त्यांचे स्वागत करण्यासाठी लोक जमले. रायपूरमधील जनसभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी गीता प्रेसच्या शताब्दी समारोप सोहळ्याला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी येथे रोड शो केला. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी रायपूरमध्ये 7600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. गोरखपूरनंतर पंतप्रधान वाराणसीला भेट देणार आहेत. वास्तविक, पंतप्रधान मोदी 7-8 जुलै रोजी चार राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. ते या चार राज्यांना 50,000 कोटी रुपयांच्या योजना भेट देतील. पंतप्रधान मोदी शुक्रवारी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. तर शनिवारी म्हणजेच 8 जुलै रोजी ते तेलंगणा आणि राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. (हेही वाचा - 'Modi Surname' Remark Defamation Case: Rahul Gandhi यांना दिलासा नाहीच; शिक्षा माफीचा अर्ज Gujarat High Court नेही फेटाळला)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)