Suheldev Superfast Express Viral Video: ट्रेनमध्ये प्रवाशी संतापले, चक्क टीसीला टॉयलेटमध्ये केलं बंद, पाह काय घडले 'त्या' ट्रेनमध्ये

प्रवाशांनी चक्क तिकीट कलेक्टरची कॉलर पकडून त्याला शौचालयात बंद केलं.

Suheldev Superfast Express Viral Video - pc Twitter

Suheldev Superfast Express Viral Video :  सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये संतापलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केल्याची घटना समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेत लाईट गेली होती. लाईट गेल्यामुळे एसी आणि फॅन बंद पडले. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रवाशांना उकाड्याने त्रास झाला. त्यामुळे प्रवाशांनी वैतागून टीसीला टॉयलेट मध्ये बंद केले. सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस दिल्लीहून उत्तर प्रदेशच्या गाझीपुरसाठी निघाली होती. ही घटना समजताच रेल्वेचे अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संतप्त प्रवाशांना शांत करत तातडीने तांत्रिक बिघाड दूर केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)