PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी दिल्लीतील महिलांनी त्यांना लिहिलेले पत्र शेअर केले. तसेच हे पत्र मिळाल्याने आपण भारावून गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले. 'जहां झुग्गी वही मकान' योजनेंतर्गत पक्की घरे मिळालेल्या कालकाजी, दिल्लीच्या माता आणि भगिनींची पत्रे मिळाल्याने मी भारावून गेलो, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, परराष्ट्र मंत्री @DrSJaishankar तिथे गेले तेव्हा महिलांनी त्यांना ही पत्रे सुपूर्द केली, ज्यात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. या योजनेद्वारे त्यांचे वर्षांचे जुने स्वप्न कसे पूर्ण झाले आणि संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे सुकर झाले हे त्या सांगतात. अनेक पत्रांबद्दल तुम्हा सर्वांचे आभार! आमचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी त्याच वचनबद्धतेने काम करत राहील, असंही पंतप्रधानांनी आश्वासन दिलं आहे.
दिल्ली के कालकाजी की उन माताओं और बहनों के पत्रों को पाकर अभिभूत हूं, जिन्हें ‘जहां झुग्गी वहीं मकान’ स्कीम के तहत पक्के घर मिले हैं। विदेश मंत्री @DrSJaishankar जी जब वहां गए तो महिलाओं ने ये पत्र उन्हें सौंपे, जिनमें उन्होंने अपनी खुशी जाहिर की है। वे बताती हैं कि कैसे इस स्कीम… pic.twitter.com/M1nOtV3Phj
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)