Russia Ukraine War: खार्किवमध्ये 'ऑपरेशन गंगा' यशस्वी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले - सर्व भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

'ऑपरेशन गंगा' अंतर्गत आतापर्यंत सुमारे 13,300 भारतीयांना घेऊन 63 उड्डाणे भारतात पोहोचली आहेत. पुढील 24 तासांमध्ये आणखी 13 फ्लाइटचे वेळापत्रक आहे.

Arindam Bagchi (Photo Credit - Twitter)

युक्रेनच्या खार्किवमध्ये अडकलेल्या जवळपास सर्व भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (MEA प्रवक्ते) यांनी शनिवारी ही माहिती दिली.  अरिंदम बागची पुढे म्हणाले की, गेल्या 24 तासांत 15 उड्डाणे भारतात पोहोचली आहेत, ज्यामध्ये सुमारे 2900 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत आतापर्यंत सुमारे 13,300 भारतीयांना घेऊन 63 उड्डाणे भारतात पोहोचली आहेत. पुढील 24 तासांमध्ये आणखी 13 फ्लाइटचे वेळापत्रक आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement