Gurugram Accident: गुरुग्राममध्ये कारने स्टंट करणाऱ्या मद्यधुंद तरुणांनी 3 जणांना चिरडले, 1 ठार, 7 आरोपींना अटक
आरोपींनी दारूच्या नशेत स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली. स्टंट सुरू असताना दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या तिघांना कारने धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
- Read in
- मराठी
Gurugram Accident: गुरुग्राम येथील उद्योग विहार-1 पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री रस्त्यावर स्टंटबाजी करत असताना कार स्वारांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तिघांना धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्याचवेळी या प्रकरणातील सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी रुग्णालयात दाखल आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात येईल, असं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
पोलिसांनी सांगितले की, सात आरोपी आपल्या मित्रांसह चार वाहनांतून उद्योग विहार परिसरात येत होते. यादरम्यान आरोपींनी दारूच्या नशेत स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली. स्टंट सुरू असताना दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या तिघांना कारने धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
शराब के नशे में स्टंट करने वाले लड़कों ने एक युवक की जान ले ली, वीडियो गुरुग्राम का है. pic.twitter.com/mxPR0Js9ox
— rajni singh (@imrajni_singh) November 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2022 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

