Wrestlers Protest at Jantar Mantar: कुस्तीपटूंना आता Bharatiya Kisan Union ची साथ; बॅरिकेट्स तोडत आंदोलनात सहभागी (Watch Video)

कृपया शांत राहा आणि कायद्याचे पालन करा असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

BKU | Twitter/ANI

कुस्तीपटूंनी WFI प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून ऊन-पाऊस वार्‍यामध्ये ते आंदोलन करत आहेत. आज त्यांना साथ देण्यासाठी  Bharatiya Kisan Union पोहचली आहे. दिल्लीत आंदोलनस्थळी जाण्यासाठी BKU ने पोलिस बॅरिकेट्स तोडून कुस्तीपटूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती दिल्लीमध्ये निर्माण झाली होती. Sexual Harassment Of Women Wrestlers: महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषणप्रकरणी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)