Workplace Demand: भारतामधील वर्कप्लेसच्या मागणीत वाढ; ऑफशोरिंग कंपन्यांनी 2023 मध्ये देशात 46 टक्क्यांहून अधिक कार्यालयीन जागा भाड्याने घेतल्या

ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) च्या नेतृत्वाखालील ऑफशोरिंग कंपन्यांनी 2023 मध्ये देशात 46 टक्क्यांहून अधिक कार्यालयीन जागा भाड्याने घेतल्या आहेत, ज्याने एकूण 27.3 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र व्यापले आहे.

Workplace Demand

Workplace Demand: भारतात नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपली कार्यालये थाटत आहेत. नाइट फ्रँकच्या अहवालातून हे समोर आले आहे. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) च्या नेतृत्वाखालील ऑफशोरिंग कंपन्यांनी 2023 मध्ये देशात 46 टक्क्यांहून अधिक कार्यालयीन जागा भाड्याने घेतल्या आहेत, ज्याने एकूण 27.3 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र व्यापले आहे. ऑफिस लीजमध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचा वाटा 2023 मध्ये 35 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो एका वर्षापूर्वी 25 टक्क्यांवर होता. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स ही जागतिक कंपन्यांनी स्थापन केलेली विशेष कॅप्टिव्ह युनिट्स आहेत, जिथे ते संशोधन आणि नाविन्यपूर्णतेपासून अनेक सेवा ऑफर करतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आहेत आणि गेल्या एका वर्षात वित्तीय सेवा, वाहन, आरोग्यसेवा यासारख्या इतर क्षेत्रांनीही भारतात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स स्थापन केले आहेत. (हेही वाचा: Rahul Gandhi: सत्तेत आल्यास बेरोजगार तरूणांसाठी 'पहली नौकरी पक्की' योजना, गावाबरोबर शहरांमध्येही राबवणार मनरेगा योजना - राहुल गांधी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now