'महिला नशेत असताना तिच्या पुरुष मित्राला तिच्या स्थितीचा अवाजवी फायदा घेण्याचा परवाना देत नाही'- Delhi Court
साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील गुप्ता यांनी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 354 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) अंतर्गत पुरुषाची शिक्षा कायम ठेवली.
दिल्लीच्या साकेत कोर्टाने सांगितले की, एक महिला ती नशेत असताना तिच्या पुरुष मित्राला तिच्या स्थितीचा गैरफायदा घेण्याचा परवाना देत नाही. न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरु होती त्यावेळी कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. अहवालानुसार, महिला दारूच्या नशेत असताना तिच्या आरोपी मित्राने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेने मित्राच्या या कृत्याला विरोध केला असता आरोपीने तिला थप्पड मारली. आता न्यायालयाने गुन्हेगारी बळाचा वापर करून महिलेचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करून, तिला थप्पड मारून दुखापत केल्याबद्दलची आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.
साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील गुप्ता यांनी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 354 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) अंतर्गत पुरुषाची शिक्षा कायम ठेवली. महिला कोर्टाने संदीप गुप्ता नावाच्या आरोपीला 5 फेब्रुवारी 2019 रोजी दोषी ठरवून त्याला एक वर्षांची शिक्षा सुनावली होती. या आदेशाविरोधात आरोपीने साकेत कोर्टात अपील दाखल केले होते. या ठिकाणी आरोपीची याचिका फेटाळून महिला कोर्टाची शिक्षा कायम ठेवण्यात आली. (हेही वाचा: Legal Terrorism: आयपीसी कलम 498A चा गैरवापर करून महिला पसरवत आहेत 'कायदेशीर दहशतवाद'; Calcutta High Court ची टिपण्णी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)