Woman Kills Her Children: उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये आईने आपल्या 4 मुलांना पाण्यात बुडवले; तिघांचा मृत्यू, एकाने कसाबसा वाचवला जीव (Watch Video)

प्रियांकाच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाल्याचे कळते. सध्या ती तिच्या चुलत दिरासोबत राहत आहे. कुटुंबीयांशी भांडण झाल्याच्या रागातून मुलांची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे.

Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Woman Kills Her Children: यूपीच्या औरैया जिल्ह्यात एका आईने आपल्या चार निष्पाप मुलांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला, तर सर्वात मोठ्या मुलाचा जीव कसा तरी वाचला. चौथा मुलगा अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी काही लोकांना मुलांचे मृतदेह पाण्यात दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सीओ आणि पोलीस अधीक्षक त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी आई प्रियांकाला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. प्रियांकाच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाल्याचे कळते. सध्या ती तिच्या चुलत दिरासोबत राहत आहे. कुटुंबीयांशी भांडण झाल्याच्या रागातून मुलांची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. या घटनेमध्ये वाचलेल्या मुलाने सांगितले की, आईने तीन भावांना काहीतरी खाऊ घातले आणि नंतर नदीत ढकलले. नदीत पडताच प्रथम आदित्य, नंतर माधव आणि नंतर मंगल यांचा बुडून मृत्यू झाला. आई आपल्याकडे येत आहे असे दिसताच आपण तिथून पळ काढला. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: बँक व्यवस्थापकाचा कार्यालयात काम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement