Woman Dies by Suicide Over Dark Complexion: सावळ्या रंगाच्या टोमण्यांना कंटाळून नवविवाहित महिलेने केली आत्महत्या; 3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
अहवालानुसार, सासरचे लोक महिलेला सतत ती सावळी असल्याने टोमणे मारत होते. या त्रासाला कंटाळून महिलेने आपले जीवन संपवले.
Woman Dies by Suicide Over Dark Complexion: पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात एका नवविवाहित महिलेने तिच्या सावळ्या रंगाच्या टोमण्यांना कंटाळून कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत महिलेचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अहवालानुसार, सासरचे लोक महिलेला सतत ती सावळी असल्याने टोमणे मारत होते. या त्रासाला कंटाळून महिलेने आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय निर्मल कौरचा विवाह मोगा येथील दिलदीपसोबत तीन महिन्यांपूर्वी झाला होता. पण निर्मल कौरचा पती आणि सासरचे लोक तिला टोमणे मारायचे. लग्नाच्या काही दिवसांनी सासरच्या लोकांनी महिलेला माहेरी सोडले. त्यानंतर सोमवारी रात्री केरखेडा गावातून जाणाऱ्या कालव्यात उडी घेऊन महिलेने आत्महत्या केली. (हेही वाचा: Ahemadabad Video: स्वत: चा जीव धोक्यात घालून जवानांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण, अहमदाबाद येथील घटना)
पहा पोस्ट-
Upset over taunts by in-laws over her complexion, newly married woman dies by suicide in Punjab's Fazilka.
The woman had got married 3 months back. According to her family, her in-laws had left her at her maternal home 2 days ago. They also said the woman had told them her… pic.twitter.com/XiAcouAtC1
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 06:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

