Wife's Obscene Videos Shared With Extra-Marital Partner: विवाहबाह्य जोडीदारासोबत शेअर केले पत्नीचे अश्लील व्हिडिओ; न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन
एकल-न्यायाधीशांनी तक्रारदाराच्या पतीसह त्याच्या विवाहबाह्य जोडीदारालाही अटकपूर्व जामीन मंजूर केला. तक्रारदाराचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याच्या आरोपावरून या दोघांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 12 मे रोजी दिलेल्या आदेशात एका पतीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या व्यक्तीवर त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे त्याच्या विवाहबाह्य जोडीदारासह शेअर केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती गुरबीर सिंग यांनी सांगितले की, हा अश्लील कंटेंट सर्वसामान्य लोकांसोबत शेअर केला गेला नाही. तसेच विवाहबाह्य जोडीदाराच्या वकिलाने सांगितले की तिने हा व्हिडिओ प्रकाशित केला नाही किंवा प्रसारित केला नाही आणि तिला विनाकारण जोडप्यामधील वैवाहिक विवादात ओढले जात आहे. त्यानंतर एकल-न्यायाधीशांनी तक्रारदाराच्या पतीसह त्याच्या विवाहबाह्य जोडीदारालाही अटकपूर्व जामीन मंजूर केला. तक्रारदाराचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याच्या आरोपावरून या दोघांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: Unnao Crime: मुल होत नसल्याने पहिल्या पत्नीची हत्या, नंतर घरातच पुरला मृतदेह)