Shocking Video: दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी अचानक नदीची पातळी वाढली; 7 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी (Watch)

अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली व लाटा इतक्या वेगाने उसळू लागल्या की लोकांना वेळीच बाहेर पडता आले नाही.

Shocking Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गापूजा विसर्जनाच्या वेळी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी जलपाईगुडी जिल्ह्यातील माल नदीची आहे. येथे माल नदीवर अनेकजण विसर्जनासाठी आले होते. त्यावेळी अचानक पाण्याची पातळी वाढू लागली. अशा परिस्थितीत लोक अडकले आणि बघता बघता 7 जणांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये अनेक लोक मूर्ती विसर्जनासाठी नदीत उतरले असल्याचे दिसत आहे. मात्र त्यानंतर अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली व लाटा इतक्या वेगाने उसळू लागल्या की लोकांना वेळीच बाहेर पडता आले नाही. घटनास्थळी आरडाओरडा होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून 10 जण जखमी झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)