Watch: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा; बंदुकीच्या धाकावर अवघ्या 50 सेकंदात लुटले लाखो रुपये (Video)

पोलिसांना दरोड्याची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला.

Bank Robbery

राजस्थानमधील पाली भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जदन शाखेत बँकेवर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवार, 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या बँक लुटीचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. हेल्मेट घातलेले दोन चोरटे बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये लुटत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील सुमारे तीन लाख रुपये हिसकावून हे चोरटे पळून गेले.

एसबीआय बँकेची ही शाखा राष्ट्रीय महामार्ग पाली-सोजतवर आहे. पोलिसांना दरोड्याची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला. सध्या शहरभर नाकाबंदी करून हल्लेखोरांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सु आहेत, परंतु अजूनही पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले नाही. या संपूर्ण चोरीसाठी दरोडेखोरांना केवळ 50 सेकंद लागले. दरोडा टाकत असताना दरोडेखोरांनी बँकेत उपस्थित सर्व लोकांचे मोबाईल फोन टेबलावर ठेवले होते, जेणेकरून कोणीही पोलिसांना माहिती देऊ नये.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement